हिंगोलीतील शिक्षकाची वेतन मिळत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या

आठ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेवर शिक्षक कार्यरत,, नुदान नसल्याने रखडले वेतन

0

हिंगोली  : हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे येथे आठ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेवर कार्यरत शिक्षक त्र्यंबक सीताराम वाबळे (वय ३४ ) यांनी वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे येथे आठ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेवर कार्यरत शिक्षक त्र्यंबक सीताराम वाबळे (वय ३४ ) यांनी वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाबळे यांचे एमए बीएड (इंग्रजी) शिक्षण झाले होते. ते मागील आठ वर्षांपासून हिंगोली तालुक्यातील इंचा येथील गुरुदास कामत विद्यालयात कार्यरत होते. मात्र या शाळेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे वेतन मिळण्याचा प्रश्नच नव्हता. अनुदान नसल्याने आर्थिक अडचणीचा प्रश्न  निर्माण झाला होता. दरम्यान, सोमवारी रात्री आठ वाजता झोपण्यासाठी शेतावर जात असल्याचे सांगून वाबळे यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. शासनाने या शाळेला २० टक्के अनुदान मंजूर केले आहे. मात्र अद्यापही निधी दिला नाही. अनुदान मंजूर झालेल्या शाळांना निधी देण्याबाबत आदेश काढण्याची मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.