‘हीरो इलेक्ट्रिक’ ने इलेक्ट्रिक स्कूटर्सवर नवीन लिमिटेड पीरियड ऑफर्सची घोषणा

दिवाळीत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार तर तुमच्यासाठी हा खास संधी

0

नवी दिल्लीः ‘हीरो इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर नवीन लिमिटेड पीरियड ऑफर्सची घोषणा केली आहे. म्हणजेच या दिवाळीत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी हा खास संधी आहे.

कंपनीने आपल्या लेड-एसिड मॉडल्सवर ३ हजार रुपये आणि लिथियम आयन मॉडल्सवर ५ हजार रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट ऑफर करीत आहे. रेफरल स्कीम अंतर्गत हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या १ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट ऑफर केला जाणार आहे. ‘हिरो’च्या या डिस्काउंट ऑफर मध्ये ‘ऑप्टिमा एचएक्स सिटी स्पीड आणि एनआयएक्स एचएक्स सिटी स्पीड वर उपलब्ध नाही. याची किंमत अनुक्रमे ५७ हजार ५६० रुपये आणि ६३ हजार ५६० रुपये आहे. या दोन्ही स्कूटर कंपनीने नुकतेच लाँच केलेले आहे. कंपनीने २ नोव्हेंबरला ही ऑफर लाँच केली होती. १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत वैध असणार आहे. ५ हजार रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट सोबत कंपनीने कोणत्याही टू व्हीलर एक्सचेंज वर ५ हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे. तसेच शून्य टक्के व्याज दराने फायनान्स देत आहे. ही ऑफर सिलेक्टेड लोकेशन्सवर वैध आहे. याची अधिक माहिती जवळच्या शोरूममधून घेता येवू शकते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.