४८ हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजासह एकास अटक..वाळूज पोलिसांची कारवाई …

0

४८ हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजासह एकास अटक…. वाळूज पोलिसांची कारवाई …..
अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजासह गांजा बाळगणाऱ्या गणेश परसराम काळे याला वाळूज पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई  गुरूधानोरा साखर कारखान्या जवळ गुरूवारी २ आगस्ट रोजी दुपारी साडेतीन वा करण्यात आली.
वाळूज परिसरातील गुरूधानोरा येथील साखर कारखान्याजवळ एकजण विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची गुप्त खबऱ्याकडून वाळूज पोलिसांना माहिती मिळाली़ होती. या खबरीवरून पोलीसांनी सापळा रचला. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संशयित गणेश काळे हा गुरुवारी दुचाकी (सुमारे ४७ हजार ५०० रूपये किमतीचा सहा किलो गांजा घेऊन जाताना दिसला. यावेळी पोलीस हेड कॉस्टेबल शेख सलीम आणि प्रदीप बोरुडे यांनी त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ नॉयलॉनच्या पिशवीत खाकी रंगाच्या कागदामध्ये तिन गांजाचे बंडल आढळून आले.
 यावेळी पोलिसांनी सहा किलो गांजा, २५ हजारांची दुचाकी असा एकूण ७२ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला गणेश काळे यास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश टाक, महिला फौजदार प्रीती फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. शेख सलीम, पोक़ॉ़ जयदीप आढे, राजाराम डाखुरे, प्रदिप बोरुडे,  राजाराम वाघ, रवींद्र बहुले, राजु वाघ यांनी केली.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.