लातूरमध्ये अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, बळीराजाची सरकारकडे मदतीची मागणी

जिल्ह्यात सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद

0

लातूर : लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही ६८ मिमी इतकी आहे. तर सर्वाधिक पाऊस हा निलंगा तालुक्यात ११० मिमी इतका झाला. नेहमी कोरड्या दुष्काळाशी लढा द्यावा लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद  झाली. जवळपास ८६० मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झाला.

जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद  झाली. जवळपास ८६० मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झाला. बोरसुरी येथील चार तर चांदोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनीम या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील पाण्याचं तळं पूर्णपणे भरुन तळ्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होतं. रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे नेलवाड ते कासारशिरसी जाणारा रस्ता झाला बंद होता. निलंगा तालुक्यातील वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा नदी भरभरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला. याशिवाय जिल्ह्यातील इतरही नदी, नाले ओढे भरभरून वाहू लागले आहेत. एकूणच दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात आता अति पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याचे दिसून येत असून बळीराजाला सरकारने भरीव मदत देण्याची मागणी होत  आहे.देवणी तालुक्यात ९० मिमी, औसा तालुक्यात ८१ मिमी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८० मिमी, चाकूर तालुक्यात ६५ मिमी इतक्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथून वाहणाऱ्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी शेतात काढुन ठेवलेली सोयाबीनची बनीम वाहून गेली. याचे चित्रण ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये चित्रित केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.