आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा येत्या 26 ऑक्टोबरपासून

वेळापत्रक जाहीर, दोन टप्प्यांमध्ये होणार लेखी परीक्षा

0

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. उन्हाळी २०२० सत्राच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम व पदविका व पदव्युत्तर वर्गाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. त्यानुसार २६ ऑक्टोबपासून लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा पार पडतील.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. उन्हाळी २०२० सत्राच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम व पदविका व पदव्युत्तर वर्गाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. त्यानुसार २६ ऑक्टोबपासून लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा पार पडतील. नुकतेच विद्यापीठाने कार्यालयीन पत्र जारी करून उन्हाळी सत्र २०२० च्या परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाची घोषणा केलेली आहे. दोन टप्प्यांमध्ये या परीक्षा पार पडणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील परीक्षा २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. या दरम्यान, जुन्या अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्ष एमबीबीएसच्याही परीक्षा होतील.

दुसरा टप्पा नोव्हेंबर अखेरीस
लेखी परीक्षेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान पार पडेल. या कालावधीत दंतशास्त्रातील विविध वर्षे, आयुर्वेदशास्त्रातील बीएएमएस, युनानीतील बीयूएमएस, होमिओपॅथीचे बीएचएमएस यांसह एमबीए (हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन), फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीएस्सी (नर्सिंग) आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडतील.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.