भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवला, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाचे अशाप्रकारे आंदोलन

0

अमरावती : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं.

अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिले, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केले.  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवून त्यांचे म्हणणं ऐकून घ्यावे लागले.  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणीत सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष प्रणीत सोनी यांनी दिला. दरम्यान, राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यात काल 17 हजार 794 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे नवीन 19 हजार 592 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 9 लाख 92 हजार 806 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 72 हजार 775 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 76.33 टक्के झाले आहे. 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.