भारतात निर्मिती होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आशादायी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

'आयसीएमआर' संचालकांशी चर्चा; आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

0

मुंबई : कोरोनाला  प्रतिबंध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे कार्य सुरू केले आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मिती होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, आज यासंदर्भात ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे महत्वाच्या १३ ते १४ रुग्णालयांमध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलैपर्यंत या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनीकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन भारतात पहिली लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.