‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे मार्गदर्शन

0

औरंगाबाद  : सिडकाे वाळूज महानगर -1 म्हाडा काॅलनी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत ता. 18 आँक्टाेंबर राेजी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. आमदार संजय शिरसाट यांनी  मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाने काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

सिडकाे वाळूज महानगर -1 म्हाडा काॅलनी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत ता. 18 आँक्टाेंबर राेजी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. आमदार संजय शिरसाट यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना मोहिमेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने काळजी कशी घ्यावी याबाबत परिसरातील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांनी केले हाेते. आरोग्य तपासणी  शिबिर, दौलताबाद आरोग्य केंद्र तसेच वाळूज रुग्णालय यांच्या सहकार्याने घेण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सहाय्यक एस. आर गायकवाड, वाळूज रुग्णालयाचे डाॅ.दीपाली दिघे पाटील, डाॅ.शाहीद पटेल , प्रमिला पवार आशा गटप्रवर्तक के. एस झळके, ज्योती सानप, ज्योती वाघ, कल्याणी धीवर, वर्षा हनुमंते, अरूणा काठवठे यांनी नागरिकांची तपासणी केली. या आराेग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदवला. यात संजय जगताप, रामेश्वर राऊत, शिवाजी जाधव, केरे बाळासाहेब, अमोल पोटे, लता बन, कल्पना वाघमारे, संजय अनपट, एकनाथ दहिफळे, संजय उच्चेकर, दिनेश खिराडे, कैलास पायघन, व्ही व्ही जाधव , जालिंदर कऱ्हाळे, आविनाश सुतवणे, गजानन गायकवाड, बाबासाहेब जाधव, मोहन नाईक, संतोष गाढे, सिध्दार्थ काळे, शीतल गंगवाल, महावीर पाटणी, शरद शेठ्ठी, नरेंद्र यादव, यश भंसाली, कुंदन त्रिपाटी यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.