हाथरस प्रकरण : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो – यशोमती ठाकूर

या प्रकरणाचा तपास  सर्वोच्च न्यायालयाने  दुसऱ्या राज्याकडे सोपवण्याची मागणी

0

अमरावती : हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तेथील राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास  सर्वोच्च न्यायालयाने  दुसऱ्या राज्याकडे सोपवावा, अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश वर देशभरातून टीका होत आहे. पीडित कुटूंबाला माहिती न देता त्या तरुणीचा मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर हाथरसच्या जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटूंबाला धमकावल्याचा व्हिडिओ ही समोर आला होता. तसेच माध्यमासोबत बोलण्यास या कुटूंबाला पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ला नेमके काय लपवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हाथरसमध्ये जे काही घडले ते अतिशय वेदनादायी घडले हे सर्व मानवजातीला लज्जास्पद गोस्ट आहे. हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवला गेला पाहिजे.  सर्वोच्च न्यायालयाने राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्या पीडितेच कुटूंब जिवंत राहिले पाहिजे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे. उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शनिवारी अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हाथरसमधील पीडित कुटुंबास भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.