हाथरस प्रकरण : मुख्यमंत्री योगींचा प्रशासनाच्या मदतीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

सरकारकडून प्रसिद्धी माध्यमांसह विरोधकांची मुस्कटदाबी, सत्ताधारी भाजपाचीच नामुष्की

0

औरंगाबाद  : उत्तर प्रदेशातील एका निर्भयावर बलात्कार करून खून केल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला व हे प्रकरण जगभरात पोहचले. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचीच नामुष्की झाली.
दिल्‍लीत काही वर्षांपूर्वी एका निर्भयावर बसमध्ये सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळच्या काँग्रेस सत्ताधार्‍यांच्या विरोधात भाजपाने तीव्र आंदोलन उभारले होते. देशात महिला, मुली सुरक्षित नसल्याची ओरड विरोधकांकडून केली होती. पण नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित समाजातील एक तरुणी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता गावातील काही समाज कंटकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिला बेदम मारहाण केली. तिची जिभ कापण्यात आली. मानेचा मणका तोडला, पायाला गंभीर इजा केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली. एवढेच नव्हे तर सदरील मुलीवर बलात्कार झालेला नाही, असे पोलिस महानिरीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. परंतु मंगळवारी डॉक्टरांच्या अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. मुलीवर कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत मध्यरात्री अंत्यसंस्कार केले. त्यामुळे योगी सरकारचा हे प्रकरण दडपण्याचा हेतू दिसून येतो. सदरील निर्भयाच्या अंत्यसंस्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काँगे्रसचे नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांन उत्तर प्रदेशच्या सीमेवर अडविण्यात आले. राहुल गांधीशी पोलिसांनी धक्‍काबुक्‍की केली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यानंतर दोन दिवसांनी राहुल, प्रियंका हाथरसला जात असताना पुन्हा पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्‍काबुक्‍की केली व कार्यकर्त्यांवर लाठीमार ही केला. रविवारी समाजवादी पक्ष आणि आरएलडीचे कार्यकर्ते हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांना रोखण्यात आले. अशा प्रकारे उत्तर प्रदेश सरकारने पोलिस आणि प्रशासनामार्फत कोंडी करण्यामागे सरकारचा काय हेतू होता, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून आता राज्यात हाथरस प्रकरणाचे निमित्त करून दंगे घडविण्याचा काहींचा कट होता, असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने संबंधितावर कारवाई करायला पाहिजे. पण हे प्रकरण दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न योगी सरकारने केला. तो त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येते

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.