हाथरस येथील बलात्कारप्रकरणी : देशभर आक्रोश, रामदास आठवले गप्प का?
हाथरसमधील तरूणीवर पाश्वी अत्याचाराच्या निषेधार्थ देशभर आक्रोश
मुंबई : उत्तरप्रदेशामधील हाथरस येथील तरूणीवर झालेल्या पाश्वी बलात्कारप्रकरणाच्या निषेधार्थ काल देशभर आक्रोश सुरू होते. हाथरसच्या भयानक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना, केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या आठवले यांना त्यावर एक अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे पँथरच्या लढाऊपणाचा इतिहास सांगणारे आठवले गप्प का , असा सवाल विचारण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या बलात्कारप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी यूपीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्यता द्यावी तसंच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली. दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलेली अभिनेत्री पायल घोषला घेऊन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काल राजभवनवर गेले. पण उत्तरप्रदेशातील हाथरस येथील तरूणीवर झालेल्या पाश्वी बलात्कारप्रकरणाच्या निषेधार्थ काल देशभर आक्रोश सुरू होता. हाथरसच्या भयानक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना, केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या आठवले यांना त्यावर एक अक्षर काढावसे वाटले नाही. हाथरस प्रकरणी संतापाची लाट देशात असताना, पँथरच्या लढाऊपणाचा इतिहास सांगणारे आठवले गप्प का होते. आठवलेंची उपेक्षितांबाबतची कळकळ कुठे गेली. अखेर रात्री उशिराने आठवले यांना हाथरसच्या पीडितेची आठवण झाली का, असे सवाल आता केले जात आहेत.