“महाविकास आघाडीच्या अर्ध्या मंत्र्यांना वाटते, मराठा आरक्षण देऊ नये”

माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची राज्य सरकारवर टीका

0

जळगाव : राज्यात तीन पक्षांचे सरकार. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असे वाटते, अशी टीका माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन  यांनी राज्य सरकारवर केली. तसेच, मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटले नाही;  असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

राज्यात जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. न्यायालयात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही.” असे ते म्हणाले. तसेच, हे सरकार दिल्लीलाही जात नाही आणि कमिटीही तयार करत नाही, असे म्हणत सरकार आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, ‘आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही’, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांनाही लगावला. दरम्यान, मराठा आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. तर, मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही; असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळाले. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरू झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.