गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात, घटस्थापना मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्तीसाठीची नवरात्री. भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा

0

औरंगाबाद  : गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री असते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री वर्षात दोन वेळा येते. पहिली माघच्या महिन्यात येते आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. माघ महिन्याची गुप्त नवरात्री आज 12 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा-पाठ करतात.

गुप्त नवरात्रीचे महत्त्व काय? :  साधारणपणे गृहस्थ कुटुंबातील लोक गुप्त नवरात्रीचे व्रत ठेवू शकत नाही. ते चैत्र आणि शारदीय नवरात्री मध्ये देवीची उपासना करू शकतात. गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठीची नवरात्री असते. यामध्ये भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा केली जाते. तांत्रिक विशेष रुपाने या नवरात्रीमध्ये साधना करतात. गुप्त नवरात्रीदरम्यान करण्यात येणारी पूजा, मंत्र, पाठ आणि प्रसाद सर्व काही रहस्य ठेवले जाते. तरच ही साधना यशस्वी होते. साधनेदरम्यान देवी भगवतीचे भक्त कडक नियमांचे पालन करतात.

या दहा महाविद्यांची करतात पूजा  : माता कालिका,  तारा देवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, माता चित्रमस्ता, त्रिपूर भैरवी, माता धूम्रवती., माता बगलामुखी, मातंगी, कमला देवी, शुभमुहूर्त कलश स्थापनेची शुभ वेळ : सकाळी 8 वाजून 34 मिनिटे ते 9 वाजून 59 मिनिटांपर्यंत. अभिजीत मुहूर्त : दुपारी 12 वाजून 13 मिनिटे ते 12 वाजून 58 मिनिटांपर्यंत

गुप्त नवरात्रीलास अशी करा पूजा : पूजेसाठी सर्वात आधी कलश स्थापन करावा लागतो. यामध्ये देवी दुर्गेचे पूजन विना कुठल्याही विघ्नाशिवाय कुशलतेने संपन्न होऊ शकेल. देवी दुर्गेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करुन लाल रंगांचे कुंकू आणि सोनेरी गोटे असलेली ओढणी अर्पित करा. पूजा स्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेच्या जमिनीवर सात प्रकारचे धान्य, पवित्र नदीची वाळू आणि जव टाका. कलशात गंगाजल, लवंग, वेलची, पान, सुपारी, रोली, मौली, अक्षत, हळद, शिक्का आणि फुल टाका. आंब्याची पाने कलशावर सजवून ठेवा, वरुन जव किंवा तांदूळ वाटीत भरुन कलशाच्या वर ठेवा. त्यामध्ये नवीन लाल कपड्यात बांधून पाणी असलेले नारळ डोक्याला लावून नमस्कार करा आणि कलश वाळूवर स्थापन करा. त्यानंतर नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावा. सोबतच देवीच्या विशेष मंत्र, पाठ याचे गुप्त रुपाने पठन करा. जास्त करुन अघोरी आणि तांत्रिक गुप्त नवरात्रीदरम्यान मध्यरात्री देवीची पूजा करतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.