बदनापूरमध्ये अतिवृष्टीनेबाधित शेतपिकांची पालकमंत्री राजेश टोपेंकडून पाहणी

शेतातील पीक व शेत पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही !

0

जालना : बदनापूर तालुक्यामध्ये तीन ते चार वेळा झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेत व शेतपिकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी  ५ ऑक्टोबर २०२० रोजी मौजे धोपटेश्वर व रोषणगांव येथील शेतात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी  ५ ऑक्टोबर २०२० रोजी मौजे धोपटेश्वर व रोषणगांव येथील शेतात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त एकही शेतीमधील पीक व शेत पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकार्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच झालेल्या पंचनाम्याचे जाहीर चावडी वाचन दवंडी देऊन करण्यात यावे, अशा सूचना तहसीलदार यांना दिल्या. तातडीने झालेल्या पंचनाम्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासंबंधीच्या सूचना दूरध्वनीव्दारे जिल्हाधिकार्यांना प्रत्यक्ष शेतातूनच दिल्या. खरडून गेलेल्या जमिनी, पिकांचे झालेले नुकसान, पडलेल्या विहिरी व पशुधन आणि मनुष्यहानीबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवून सर्व संबंधितांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. या पाहणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.सानप, तहसीलदार श्रीमती पवार, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिंदे, सर्वश्री बबलुी चौधरी, बाळासाहेब वाकुळणीकर, कैलास मदन, अदनान सौदागर, फीरोजभाई, श्रीमंत जऱ्हाड, प्रवीण पडुळ, बाबुभाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.