मराठवाड्यात भूजल पातळी उंचावली, औरंगाबादमध्ये सर्वाधिक मीटरने वाढ

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये सर्वाधिक तर लातूरमध्ये सर्वात कमी भूजल पातळीत वाढ

0

औरंगाबाद : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील विविध जिल्ह्यांना मुसळाधार पावसाने झोडपले. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेतीला याचा फटका बसला. मात्र, मुसळधार पावसाचा चांगला परिणाम समोर आला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटर तर लातूरमध्ये सर्वात कमी 0.92 मीटर भूजल पातळी वाढली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील भूजल पातळी वाढली आहे.औरंगाबादमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक भूजल पातळी वाढली. मराठवाड्यातील औरंगाबाद हा प्रमुख जिल्हा असून येथे 5.13 मीटर भूजल पातळी वाढली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एका अहवालानुसार मराठवाड्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत साधारणपणे 722.5 मिलीमीटर पाऊस होतो. मात्र, यावेळी 844.7 मिमी पाऊस झाला आहे. यंदा मराठवाड्यात पाऊस सरासरीच्या 16.9 टक्के अधिक झाला. मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये साधारणपणे 623.5 मिमी पाऊस होतो मात्र यंदा 951.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत औरंगाबादमध्ये 52 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत 5.13 मीटरनं वाढ झाली. उस्मानाबादमध्ये 2.88 मीटर, बीडमध्ये 2.16 मीटर, जालनामध्ये 2.06 मीटर, परभणीमध्ये 1.89 मीटर, हिंगोलीत 1.40, नांदेडमध्ये 1.79 आणि लातूर मध्ये 0.92 मीटर भूजल पातळी वाढली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगामादमध्ये सर्वाधिक 5.13 मीटर तर लातूरमध्ये सर्वात कमी 0.92 मीटर भूजल पातळी वाढली .

मराठवाड्यातील धरणांतील पाणीपातळी समाधानकारक

मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांतील पाणी पातळी समाधानकारक आहे. औरंगाबादमधील सर्वात मोठं धरण जायकवाडी धरणातील पाणी पातळी चांगली आहे. लातूर, परभणी, बीड जिल्ह्यातील धरणांमध्येही पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण भरल्याने लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.