‘सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन’!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा!

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छांमध्ये संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या निवडणूकपूर्व टोलमुक्त महाराष्ट्राच्या वचनाची आठवण करुन दिली आहे. तसेच सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्तीचं वचन देणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलs आहे, “रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन.” त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या सभेला संबोधित करताना सर्वांना आपल्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन असल्याचं सांगतात. तसेच आपलs सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी येणार असून ते आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी याआधी देखील उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली. मुंबई लोकल रेल्वे सुरु करावी या मागणीसाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. त्यावेळ गुन्हे दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. “आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देता ते लक्षात ठेवतो. त्याची नोंद करून ठेवतो,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.