दुधड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0

औरंगाबाद  : दुधड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. तसेच हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.

दुधड (ता.औरंगाबाद) येथे मंगळवारीअभिवादन कार्यक्रम करण्यात आला. दुधड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. तसेच हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. कोरोनाचे संकटामुळे अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद ठेवली होती. ती मंदिरे उघडण्याचा सरकारच्या निर्णयानंतर ही महाआरती घेण्यात आली. यावेळी देवाकडे उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे  म्हणाले की, कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाऊ दे, असे साकडे घातले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख अविनाश जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बळीराम बोर्डे, शिवसेना शाखाप्रमुख एकनाथ चौधरी, विभाग प्रमुख दत्ता चौधरी, विनायक चौधरी, शिवाजी तोगे, किसान सेना विभाग प्रमुख काकासाहेब बोरडे, प्रदीप देवा जोशी, गोरख बोरडे,ज्ञानेशवर चौधरी,राजु बोरडे,आदींसह शिवसैनिक उपस्थित होते,

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.