धमाकेदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखांत
तुम्हाला एखादी कार खरेदी करायची, परंतु कमी बजेटमुळे ती खरेदी करता येत नसेल तर काळजीची गरज नाही
मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. ‘मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू’, असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करू शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.
4.15 लाखांची कार 1.98 लाखांत
मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या Alto K10 VXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही सेकेंड हँड कार www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर 1.98 लाख रुपयांमध्ये विकली जात आहे. या कारची ऑन रोड किंमत 4.15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.
2012 चे पेट्रोल मॉडल
ही Maruti Suzuki Alto K10 VXI कार 2012 चे मॉडल आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार केवळ 21 438 किलोमीटर इतकी धावली आहे. ही एक फर्स्ट ओनर कार असून यामध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
टेस्ट ड्राईव्ह बुक करा
.
या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-k10-in-mumbai-2012/AXe5YsjqZPsTbFxud9S_) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करू शकता. (सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा.)