हेमामालिनी झाल्या आजी! मुलीने दिला जुळ्यांना जन्म

आहाना आणि तिचे पती वैभव व्होरा यांनी त्यांचे नामकरण अस्ट्राईया आणि आदिया असे

0

मुंबई : हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहाना देओल-व्होरा हिने 26 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला. आहाना आणि तिचे पती वैभव व्होरा यांनी त्यांचे नामकरण अस्ट्राईया आणि आदिया, असे केले आहे.
आहानाने तिच्या व्हेरिफाईड नसलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली. त्यात ती म्हणते, काही चमत्कार दुपटीने अनुभवयास येतात. आम्हाला अस्ट्राईया आणि आदिया, अशा जुळ्या कन्यारत्नांची प्राप्ती झाली. बॉलिवूडमधील एकेकाळची अभिनेत्री ईशा देओलची लहान बहीण असलेल्या आहानाचा विवाह 2 फेब्रुवारी 2014 रोजी उद्योजक वैभव व्होरा यांच्याशी झाला. या आधी जून 2005 मध्ये मुलगा झाला आहे. त्याचे नाव डॅरियन, असे ठेवले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.