विशेष भत्तापासून वंचित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष भत्ता

ग्रामपंचायत युनियनच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे यांनी दिले आदेश

0

करमाड : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील ग्रामीण भागातील गावात रात्रंदिवस काम करून गावांच्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र झटतो मात्र त्यांची द्या मया कोणालाही कशी येईना, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडत होता. औरंगाबाद जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता देण्यास ग्रामसेवक गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता देण्यास ग्रामसेवक गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या निर्णय नुसार २००७ पासून राहणीमान भत्ता देण्यास शासन निर्णय काढून त्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भत्ता मिळतच नसल्याचे वास्तव समोर आले होते. या प्रकारची ग्रामसेवकांना चौकशी केली तर त्यांना असे कोणत्याही भत्ता देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही आदेश नसल्याचे सांगून हातवर करत असे. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन वतीने पाठपुरावा सुरू केला. यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर जि.प.अध्यक्षा मीनाताई शेळके यांना पत्र व्यवहार करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानी या प्रकरणाची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावर लवकर निर्णय घ्यावा असे आदेश दिले. त्यानंतर जि.प.उपमुख्य कार्यकारी डॉ.सुनील भोकरे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता (राहणीमान भत्ता) देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील ८५६ ग्रामपंचायतींमधील आकृतिबंध अडीच ते तीन हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ८५६ ग्रामपंचायती पैकी अनेक ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता (राहणीमान भत्ता) दिला जात नव्हता म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष एकनाथ कीर्तिकर, जिल्हा सचिव भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष एस एस बागल,संघटक काकासाहेब कराळे यांनी जि.प. अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्याकडे निवेदन देत कर्मचाऱ्यांना विशेष राहणीमान भत्ता देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत उपमुख्यकार्यकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सर्व गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीमधील आकृतीबंध कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार आकृतिबंध कर्मचार्‍यांना हा भत्ता मिळणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विशेष भत्याचे दर परिमंडळ-एक , दोन आणि तीनसाठी प्रति महिना तीन हजार ७०० रुपये सुधारित करण्यात आले आहेत. याला अनुसरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ जुलै ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी राहणीमान भत्ता तात्काळ देण्यात यावा. यासाठी सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना आदेश दिले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हाध्यक्ष एकनाथ कीतीकर, जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.बागल, जिल्हा सचिव भालेराव, जिल्हा संघटक काकासाहेब कराळे, डी.डी डोंगरे, तालुकाध्यक्ष शेख शाफिक, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर ढगे, प्पासाहेब तबले, ज्ञानेश्वर आहिरे, भरत शेजवळ, शेख अब्दुल, शहादेव ससेमहाल, बाळासाहेब ढगे आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.