पदवीधर निवडणूक : भाजपनंतर महाविकास आघाडीत सुद्धा बंडखोरी?

महाविकास आघाडीत सुद्धा सर्वकाही अलेबल नसल्याचं चित्र

0

औरंगाबाद : भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीवरून बंडखोरी सुरू असतानाच महाविकास आघाडीत सुद्धा सर्वकाही अलेबल नसल्याचं चित्र आहे. कारण महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

पदवीधर निवडणुकीत मराठवाडा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे सोबत असलेल्या इतर पक्षाने उमेदवार उभा करणे अपेक्षित नाही. मात्र असे असतानाही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून सचिन ढवळे यांना उमेदवारी दिली असून याची घोषणा त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली.

‘उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत आमचं असं काही आधी बोलणं झालं नव्हतं. तसेच आमचा उमेदवारच निवडून येण्याची शक्यता आहे,’ असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीत पुणे विभाग शिक्षक पदवीधर जागेवरून काँग्रेस पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. विद्यमान अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांच्याऐवजी काँग्रेसने जयंत आसगांवकर यांना तिकीट जाहीर केले. महाविकास आघाडीचं तिकीट दत्ता सावंत अपक्ष आमदार यांना द्यावं, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. मात्र काँग्रेस पक्षाने वेगळी भूमिका घेत उमेदवार जाहीर केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.