पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी; बीडच्या माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगेंनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून बंडखोरी

0

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत उमेदवारी अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळासोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठवाड्यातील दोन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते. भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील चार उमेदवारांची घोषणा सोमवारी केली. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर , पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे. “मतदार चांगल्या पद्धतीचे मतदान करतील. मागील निवडणुकीची परिस्थितीत वेगळी होती. यावेळी परिस्थिती चांगली आहे. 2014 आणि 2020 च्या परिस्थितीत फरक आहे” अशी प्रतिक्रिया औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर शिरीष बोराळकर यांनी दिली.

पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) विरुद्ध जयंत आसगावकर (काँग्रेस) विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) विरुद्ध अभिजीत बिचुकले विरुद्ध सोमनाथ साळुंखे (वंचित)

नागपुरातून रिंगणात कोण?

संदीप जोशी (भाजप) विरुद्ध अभिजित वंजारी (काँग्रेस) विरुद्ध राहुल वानखेडे (वंचित)

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) विरुद्ध प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) विरुद्ध रमेश पोकळे (भाजप बंडखोर) विरुद्ध नागोराव पांचाळ (वंचित). एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

विधानपरिषदेवरील पाच पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.