पदवीधर निवडणूक : आमदार अंबादास दानवे, भागवत कराड यांनी मतदान करून बजावला हक्क

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी सकाळी आठपासून मतदान सुरू

0

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळ आठ  वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव पदवीीधर मतदान केंद्रावर मतदारांची कोरोना तपासणी करून नंतरच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे.

अंबड येथील जिल्हा परिषद मतदान केंद्रावर उपविभाागीय अधिकारी शशीकांत हदगल यांनी मतदानाचा हक्क बजावला. अंबाजोगाईतील जिल्हा परिषद कन्या शाळेतील केंद्रात अंधारामुळे काम करणे अवघड झाले आहे.

आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी मतदान केले. तत्पूर्वी मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्नीसह औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतदानाचा हक्क बजावला. माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावला

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.