मोफत वापरता नाही येणार आता गुगल फोटोज

गुगल फोटोज वापरण्यासाठी चार्ज लागणार. कंपनीने सर्व युजर्सना पाठवला अधिकृत मेल

0

कॅलिफोर्निया : तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज गुगल फोटोजवर सेव्ह करुन ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.
कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक मेलदेखील पाठवला आहे, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, तुम्ही गुगल फोटोज अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील.  जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने बुधवारी सांगितलं आहे. मेलमध्ये नमूद केले आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15 जीबी स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की, गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जून 2021 पूर्वीचे फोटोज काऊंट केले जाणार नाहीत

. गुगलने म्हटले आहे की, 1 जून 2021 पूर्वी अपलोड केलेले कोणतेही फोटोज, व्हिडीओज काऊंट केले जाणार नाहीत. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी गुगल वन द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे. कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही हा निर्णय विचार करुन घेतला आहे. हा एक मोठा बदल आहे. परंतु असे बदल करत असताना आम्ही तुम्हालाही यात सामील करुन घेत आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी एक नवे टूल जनरेट करत आहोत. या टूलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील की, तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.

गुगलची नवी पॉलिसी; मेल, फोटो, व्हिडिओ डिलीट होणार

सतत अपडेट असलेल्या गुगलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी
(गुगल आपली सर्व सामग्री हटवू शकेल) आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेले अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाही. त्यांचे जी मेल आणि गुगल ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत.
गूगल वन सर्व्हिस
गुगल वन कंपनीचा पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी तसेच, फोन बॅकअपसाठी करु शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गूगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गूगलने व्हीपीएन सुविधा सुरू केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.