गुगल मिटींग सुरू आणि बायकोला किस करण्याचा मोह, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल. या व्हिडीओत एक व्यक्ती गुगल मीटवर चर्चा

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी परवानगी दिली आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आवडतही आहे. मात्र, काही लोकांना आपल्या कुटुंबियांसमोर काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत आहे. यावेळी अचानक त्याची पत्नी तिथे येते. तिला आपल्या पतीला किस करण्याचा मोह होतो आणि ती तसा प्रयत्न करते. यावेळी पतीची झालेली घालमेल कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला मजेशीर रिप्लाय येत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत आहे. ही मिटिंग सुरु असताना अचानक त्याची पत्नी तिथे येते. ती महिला आपल्या पतीला किस करण्याचा प्रयत्न करते. यावेळी पती प्रचंड अस्वस्थ होतो. तो पत्नीवर भडकतो. काय सुरू आहे? कॅमेरा सुरु आहे, असे तो व्यक्ती पत्नीला म्हणतो. त्यानंतर तो पुन्हा मिटिंगला जॉईन होतो. व्हिडीओ शेअर करताना रुपिन शर्मा यांनी ‘वर्क फ्रॉम होम के खतरे’ असे हिंदीत कॅप्शन दिले. या व्हिडीओला त्यांनी 13 फेब्रुवारीला शेअर केले होते. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. या व्हिडीओवर अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. “जेव्हा मिटिंगमध्ये असाल तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करायचा. पण या व्यक्तीच्या प्रेमळ पत्नीला खरंच मानले पाहिजे”, अशी कमेंट एका यूजरने दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.