सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा, दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा!
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर कोरोनाला पराभूत लवकरच सर्वांसोबत- सुप्रिया सुळे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर दादा लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा त्यांच्या चुलत भगिनी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्या.
अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर दादा लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा त्यांच्या चुलत भगिनी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्या. “अजितदादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी ती निगेटिव्ह आली होती. मात्र कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले असता, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.