सर्वाधिक काळ आसामचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले तरुण गोगोई यांचे निधन
गुवाहाटीच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णाालयामध्ये त्यांनी घेतला अखेरचा श्वास
गुवाहाटी : आसमचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (84) यांचे सोमवारी निधन झाले. ऑगस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले होते, पण नंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशंसने त्यांना ग्रासले. गुवाहाटीच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णाालया मध्ये सायंकाळी 5 वाजून 34 मिनीटांवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आसमचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (84) यांचे सोमवारी निधन झाले. ऑगस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले होते, पण नंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशंसने त्यांना ग्रासले होते. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीनवेळामुख्यमंत्रीपद भूषवले होते. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णाालयात गोगोई यांचे रविवारी 6 तास डायलिसिस करण्यात आले होते, पण शरीरात परत टॉक्सिन जमा झाले. यानंतर त्यांचे शरीर डायलिसिस करण्याच्या स्थितीत राहिले नाही.
ऑगस्टमध्ये कोरोना झाल्यावर दोन महिने उपचार घेतला
गोगोई 2 नोव्हेंबरपासून हॉस्पीटलमध्ये दाखल होते. शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले. 25 ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णाालया मध्ये दाखल करण्यात आले होते. दोन महिने उपचार घेतल्यानंतर 25 ऑक्टोबरला त्यांना सुट्टी देण्यात आली होती.
सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवले
तरुण गोगोई यांचा जन्म 1 एप्रिल 1936 ला झाला होता. 2001 ते 2016 पर्यंत ते असमचे मुख्यमंत्री होते. गोगोईने काँग्रेसला सलग तीन निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. त्यांच्या नावे सर्वात जास्त काळ असमच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय ते सहावेळा लोकसभेत गेले. 1971 ते 1985 पर्यंत तीन वेळा जोरहटवरुन खासदार म्हणून निवडूण गेले. यानंतर 1991-96 आणि 1998-2002 दरम्यान कालीबोरवरुन खासदार होते. सध्या या जागेवरून त्यांचे पुत्र गौरव गोगोई खासदार आहेत.