गिरीश महाजनांच्या गाडीची दुचाकीस धडक, जखमीची प्रकृती चिंताजनक

एक वैद्यकीय कर्मचारी गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात दाखल

0

जळगाव : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला असून त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ ही घटना घडली. बी.सी. पवार असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहेत. लोहारी-वरखेडीतून गिरीश महाजनांची गाडी  जात असताना वैद्यकीय कर्मचारी आपल्या दुचाकीवरुन समोरुन येत असता, त्यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीस महाजनांच्या गाडीने धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात त्यांना गंभीर मार लागला असून अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. अपघातानंतर महाजन यांनी स्वत: जखमी पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.