‘लागिरं…’मधील ‘जीजी’ अभिनेत्री कमल ठोके अनंतात विलीन

कराडमध्ये अभिनेत्री कमल ठोकेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

0

कराड : ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74 ) यांचे काल सायंकाळी बंगळूरू येथे निधन झाले. मराठी चित्रपट सृष्टीत त्या ‘जीजी’ म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून त्या घराघरांत पोहोचल्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कमल ठोके हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. बंगळुरू येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर 14 नोव्हेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंतर, कमल यांचा अभिनयातील प्रवासही मोठा होता. 1992 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बरे इतकेच नाही, यावेळी त्या कराडमध्ये शिक्षिकादेखील होत्या. कमल ठोके यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले. श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षिकेची नोकरी सांभाळत अभिनय जागृत ठेवला. नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केलं. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. शिक्षक निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनयाची सेवा केली. अल्पावधित प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची ”लागिर झालं जी” या मालिकेतून त्या घराघरांत ‘जीजी’ या नावाने परिचित झाल्या आणि नावलौकिक मिळवला. श्रीमती ठोके यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज कराडला त्यांच्या मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी मान्यवरांसह चित्रपट, नाट्य सृष्टीतील लोकांनी अंतिम दर्शन घेऊन अभिवादन केलं. यानंतर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुनील यांने त्यांना मुखाग्नी दिला. सगळ्यांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.