गौरी गडाखांच्या आत्महत्येने सोनई गावावर पसरली शोककळा

गळफास घेतल्याने गौरी गडाख यांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात झाले स्पष्ट

0

अहमदनगर : गौरी गडाख शनिवारी रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गौरी गडाखांच्या आत्महत्येने सोनई गावावर शोककळा पसरली आहे.

गौरी गडाख शनिवारी रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गौरी गडाखांच्या आत्महत्येने सोनई गावावर शोककळा पसरली आहे. गौरी यांच्या पश्चात पती प्रशांत गडाख, नेहल आणि दुर्गा या दोन मुली आहेत. गौरी गडाख समाजकारणात सक्रिय होत्या. अनेक समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी राबवले होते. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  गडाख कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अहमदनगरला गेले. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांच्या वहिनी गौरी प्रशांत गडाख. शनिवारी रात्री राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. गळफास घेतल्याने गौरी यांचा मृत्यू झाल्याचंे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी. गौरी या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत. गडाख कुटुंबाच्या कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर सोनाईला गेले होते.  सोनई येथे वांबोरीत रविवारी सायंकाळी गौरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पुतणे उदयन गडाख यांनी मुखाग्नी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.