साताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला

पाटणमध्ये या हल्ल्यात दोन लहान मुलींचा मृत्यू तर अन्य पाच जण गंभीर जखमी

0

सातारा : गांधील माश्या चावल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाटणच्या ढेबेवाडी परिसरातील महिंद येथे  या दोन्ही मुली घराच्या गच्चीवर खेळत असताना त्यांच्यावर अचानक गांधील माश्यांनी हल्ला केला. यात दोन चिमुकलींचा जीव गेला.

पाटणच्या ढेबेवाडी परिसरातील महिंद येथे  दोन्ही मुली घराच्या गच्चीवर खेळत असताना त्यांच्यावर अचानक गांधील माश्यांनी हल्ला केला. घराजवळ असलेल्या एका पडक्या घराच्या छपराला गांधील माश्यांचे पोळे होते. या पोळ्याला धक्का लागल्याने माश्या चवताळल्या आणि त्यांनी गच्चीवर खेळत असलेल्या लहान मुलांवर हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या अजून पाच जणांना माश्यांनी जखमी केले आहे. अनुष्का दिनेश यादव (वय 12) आणि शेजल अशोक यादव (वय 8) असे मृत मुलींची नावे आहेत.  मृत मुलींपैकी अनुष्का यादव ही येळगाव, तालुका- कराड येथील असून ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती. लहान मुलींच्या अशा अचनाक झालेल्या मृत्यूमुळे महिंद गावासह ढेबेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.