भाऊबीजेच्याच दिवशी बहिणीला शहीद भावाच्या पार्थिवाचे अंंत्यदर्शन

आजराचे ऋषिकेश जोंधळे आणि काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य

0

कोल्हापूर : जम्मू काश्मीरमध्ये  सीमा भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आले. अंत्यसंस्कारांसाठी या दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आले.

ऋषीकेश जोंधळे हे पूंछ जिल्ह्यातील सावजीयानमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या गोळीबारात जोंधळे जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी सैनिकी रुग्णालयामध्ये नेण्यात येत असतानाच त्यांना हौतात्म्य आले.  सोमवारी म्हणजेच एकीकडे भाऊबीजेचा दिवस सुरू झाला असतानाच दुसरीकडे मात्र जोंधळे कुटुंबावर भलतीच शोकळा पसरली. बहीण- भावाच्या नात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या  भाऊबीजेच्या दिवशी जोंधळे यांच्या बहिणीच्या नशिबी मात्र नियतीने हा दिवस लिहिला होता.  दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही हा तो क्षण, जेव्हा भाऊबीजेसाठी अनेकांना भावाचे बहिणीकडे येणे अपेक्षित असते. जोंधळे यांच्या धाकट्या बहिणीवाही हीच अपेक्षा होती. परंतु , या बहिणीला मात्र याचदिवशी शहीद भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ आली.  त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आयुष्यातील सर्वात वाईट दिवस तिच्या नशिबी आल्याने तिने अ्श्रूला वाट मोकळी करून दिली.  कोल्हापूरचे जवान ऋषीकेश जोंधळे आणि काटोलचे रहिवासी. अवघ्या विसाव्या वर्षी या तरूणाने भारत मातेसाठी आपला प्राण ठेवला. जोंधळे यांच्या मागे त्यांचे आई वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे.

१६ डिसेंबर २०१८ मध्ये ऋषीकेश जोंधळे हे मराठा लाईफ इन्फ्रट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. ते राष्ट्रीय खेळाडू होते. ११ नोव्हेंबरला म्हणजेच ३ दिवसांपूर्वी ऋषीकेश यांनी घरी आई वडिलांशी संपर्क साधला होता. तोच त्यांचा कुटुंबीयांसमवेतचा अखेरचा फोनकॉल ठरला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.