न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास!

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले मत

0

जालना : मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्याचवेळी  राज्य सरकार चांगली बाजू मांडेल, याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणारे वकील रोहित यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यावर आज सुनावणी होणार असून यावेळी राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांनी वकिलांच्या टीमला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. आजची सुनावणी पाच बेंचकडे देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी मागे आपल्याला दिल्याचेही संभाजीराजे म्हणाले. मला आरक्षण नको, पण राज्यातील ८५  टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली. काल जालना शहरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषद पार पडली. या परिषदेत ते बोलत होते. यापुढे मराठा समाजाला बहुजनांच्या प्रवाहात आणायचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे ही राज्य सरकारची प्रथम जबाबदारी आहे, असे सांगायलाही संभाजीराजे विसरले नाहीत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.