शुक्रवारी ‘जागतिक मूळव्याध दिना’निमित्त मोफत तपासणी आणि उपचार शिबिर

कांचनवाडी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे

0

औरंगाबाद  : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे शुक्रवार,२० नोव्हेंबर रोजी जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या गुदविकारावरील आजारांसाठी मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मूळव्याध हा रूग्णाला त्रस्त करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मूळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुूळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मूळव्याधीमुळे दैनंदिन काम करणे, अथवा बसणे कठीण होऊ लागते, तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मूळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मूळव्याधीविषयी माहिती असणे फारच गरजेचे आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मूळव्याधीपासून नक्कीच मुक्तता मिळू शकते.
कोविड-१९ या महामारीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सोशल डिस्टंसिंग व इतर सर्व खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन करत सकाळी दहा ते दोन वाजेच्या दरम्यान होणाऱ्या शिबिरामध्ये मराठवाड्यातील विविध भागांतील मूळव्याध्येच्या रुग्णांसाठी मोफत मुळव्याधेवर उपचारासाठीची औषधी आणि उपचार करण्यात येणार आहेत.
शल्यतंत्र विभागात मूळव्याधेवर नियमितपणे संशोधन सुरू असते. विविध प्रकल्प याकरिता शल्यचिकीत्सा विभागातर्फे नियमितपणे राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून शल्यचिकीत्सा विभागातर्फे मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या गुदविकारावर मोफत तपासणी आणि उपचार शिबिर आयोजन केले आहे . या शिबिरात रुग्णांना पुन्हा पुन्हा मुळव्याध होऊ नये, याकरिता जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरातील चिकीत्सक रुग्णांना मूळव्याध असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी व कोणते पथ्य पाळावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील. मोफत नावनोंदणीसाठी मो. क्र. ९७६७६८९४४४, ०२४०-२६४६४६४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी तज्ञ चिकीत्सक म्हणून डॉ. बी. एन. गडवे, डॉ. बी. के. तिम्मेवार, डॉ. ए. ए . भुजबळ, डॉ. पी. व्ही. बोचरे, डॉ. अंकिता सुकळेकर उपचार करणार आहेत. गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. एस. व्ही. सलगरकर यांनी केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.