संत सेवालाल महाराज व माता भिमाई जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते

0

औरंगाबाद :  वाळtज येथे संत सेवालाल महाराज जयंती व माता भिमाई जयंतीनिमित्त स्वरदर्शन संस्था ग्रामोदय प्रकल्प वाळूज व मंजुळा सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज आणि माता भिमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यात एकूण 326 नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन तपासणीचा लाभ घेतला. यावेळी 200 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

वाळूज येथे संत सेवालाल महाराज जयंती व माता भिमाई जयंतीनिमित्त स्वरदर्शन संस्था ग्रामोदय प्रकल्प वाळूज व मंजुळा सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज आणि माता भिमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली हाेती. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज आणि माता भिमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी स्वर दर्शन संस्थेचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, मंजुळा संस्थेचे अध्यक्ष कल्याण लांडगे ,पतंजली किसान पंचायतचे जिल्हा प्रभारी शिवाजीराव कवडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर देशमाने, सामाजिक कार्यकर्ते रतन अंबिलवादे ,डॉक्टर रमेश मस्के ,चेतन पाटील, आरोग्य समिती सदस्य शोभा पवार, महिला महासंघाचे अध्यक्ष सिंधु धापस आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रत्येक नागरिकांची ऑक्सी मिटर व थर्मामीटर द्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन गायकवाड ,सविता जाधव, सुनील गायकवाड ,आशा तेलगोटे, अमोल केदारे, जानवी गायकवाड, विष्णू केदारे व प्रदेश कुमार आदींनी प्रयत्न केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.