बीड-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, ‘वंचित’च्या चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू
लातूरचे 'वंचित'चे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा समावेश
औरंगाबाद : औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघात होऊन चार जणांचा जागेवरच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गेवराई शहराजवळील ही घटना घडली.
औरंगाबाद-बीड महामार्गावरील गेवराई बायपासला भीषण अपघात झाला, लातूरहून औरंगाबादला येणारी आय-20 कारने लेन क्रॉस करून औरंगाबादकडून जाणाऱ्या टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातातमध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले असून अन्य एक जण गंभीररित्या जखमी आहे. महामार्ग पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. गेवराई शहरापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या बायपास जवळ कारचा भीषण अपघात झाला. अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतात लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असून ते लातूरहून बीड मार्ग औरंगाबादकडे जात होते. कारचालकाचा ताबा सुटल्याने कार ऑइल टँकरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.