बस आणि इनोव्हा कारची भीषण धडक, चार जण जागीच ठार, 3 गंभीर जखमी

बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. इनोव्हा कार शिरली बसच्या इंजिनमध्ये

0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे येथे बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली  यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भररस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूरमध्ये गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे येथे बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली.  यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भररस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे येथं हा भीषण अपघात झाला आहे. बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचे सांगण्यात येत आहे.  कारचा चक्काचूर झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी 3 जखमींना उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कारमधून चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, भर रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर स्थानिकांनीही परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर अपघाती वाहन बाजूला करून आता इतर वाहनांना जाण्यासाठी जागा देण्याते येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.