जळगावात अल्पवयीन चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

शेतामध्ये सापडले दोन अल्पवयीन मुले आणि दोन मुलींचे मृतदेह

0

जळगाव : जळगावतून राज्याला हादरवणारी घटना घडली आहे. रावेरमध्ये एकाचवेळी चौघांची हत्या करण्यात आली आहे.  यामध्ये 2 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून  पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रावेरच्या बोरखेडा रोडवरील शेतात ही घटना घडली. आज सकाळच्या सुमारास गावातील काहींना शेतामध्ये चौघांचा मृतदेह आढळला. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. रावेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  चौघांचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली असून  हे चौघेही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मुले आणि दोन मुलींचा मृतदेह ताब्यात घेतले असून जवळच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.