ट्रॅव्हल्स बसला अपघात, चौघांचा मृत्यू, ३१ जण गंभीर जखमी

नागपूर-सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात

0

नंदुरबार : नागपूर सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात बुधवारी सकाळी  भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरेली  ट्रॅव्हल्स बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. या भीषण स्वरुपाच्या या अपघातात ३१ जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. प्रवाशांनी भरेली  ट्रॅव्हल्स बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून  ३१ जण गंभीर जखमी झाले आहे.  या बसमधील बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील आहेत.  ही अपघातग्रस्त बस गुजरात पासिंगची  आहे.  या अपघातामुळे जवळच्या परिसरात एकच खळबळ उडाली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती  आहे. ज्यावेळी ही बस जवळपास ४० फूट खोल दरीत कोसळली आणि होत्याचं नव्हते झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच, पोलिस आणि बचावदलाने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. पण, अपघाताचे स्वरुप पाहता, यात काहींना आपला जीव गमवावा लागला. तर, गंभीर जखमींचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.