माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनकच

कुटुंबीयांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन

0

नवी दिल्ली : ब्रेन क्लॉट सर्जरीनंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे मात्र स्थिर आहे. या दरम्यान त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरत आहेत. यावर त्यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पण फेक न्यूज पसरवू नका, असे आवाहन केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतील लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल केले आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी सांगितले आहे की, वडिलांची प्रकृती चिंताजनक जरी असली तरी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका आणि मला फोनदेखील करू नका. कारण रुग्णालयाच्या अपडेट मिळण्यासाठी मला माझा फोन फ्री ठेवावा लागत आहे. शर्मिष्ठा यांनी काल एक ट्वीट केले होते, त्यात त्यांनी म्हटले होते की, “गेल्या वर्षी 8 ऑगस्टला माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर एक वर्षाने 10 ऑगस्टला त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांच्यासाठी जे योग्य आहे, तेच देवाने करावे. त्याचबरोबर मला दुःख आणि आनंद समान पद्धतीने स्वीकारण्याची ताकद द्यावी. मी सर्वांचे आभार मानते.” तर प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्याबद्दल कोणीही अफवा पसरवू नयेत. प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.