जळगावात माजी महापौराच्या मुलाचा हल्लेखोरांनी निर्घृणपणे खून

माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना

0

जळगाव : जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. जळगावातील शिवाजी नगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवून क्रूर पद्धतीने खून केल्याचे निदर्आशनास आले आहे. राकेश सपकाळे (28) असे या मुलाचे नाव आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव हादरले.

जळगावातील माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे आणि त्याच्या लहान भावाचे काही दिवसांपूर्वी शनीपेठेतील तरुणांशी भांडण झाले होते. त्यामुळे या दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता. राकेश हा काल (4 नोव्हेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास जळगावातील स्माशनभूमी परिसरातून येत होता. त्यावेळी रस्त्यात त्याला दोन अज्ञात तरुणांनी अडवले. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्यांनी रस्त्यावरुन येणाऱ्या एका धावत्या ट्रकसमोर त्याला ढकलले. या ट्रकचा फटका राकेशच्या डोक्याला बसला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. यानंतर मारेकऱ्यांनी चाकूच्या सहाय्याने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार केले. त्यानंतर घटनास्थळाहून पळ काढला. गंभीररित्या जखमी झालेल्या राकेशचा काही वेळातच मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्याचा खून नेमका का झाला? याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.