औरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण

शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू

0

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील ‘सिग्मा’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील ‘सिग्मा’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शहरात आले होते. त्यावेळी नंदकुमार घोडेलेंच्या संपर्कात आलेले सामंत व शिवसेनेचे इतर उपस्थित नेते ’ क्वारन्टाईन ’ होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  तीन दिवसांपूर्वी 19 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परीक्षांसंदर्भात आढावा घेण्याकरिता उदय सामंत औरंगाबादेत आले होते.
त्यावेळी नंदकुमार घोडेले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले होते. तसेच त्याचदिवशी त्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची देखील सदिच्छा भेट घेतली होती. तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमातदेखील त्यांनी सहभाग नोंदवला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.