माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वृद्धापकाळाने निधन 

0

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अल्झायमर नावाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज यांचा मुलगा अमेरिकेतून आल्यानंतर ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते होते. ते संयुक्त जनता दल पक्षाचे जेष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री असताना त्यांनी उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार संभाळला होते. त्यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते स.का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. परंतु 1971 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते.

आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशाने पहिल्यांदा पाहिला होता. आणबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशातील कामगारांसाठी प्राणपणाने झुंजणारा नेते हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.