पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी : सकाळी 10 पर्यंत मतदानाची आकडेवारी

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

0

पुणे :  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे.  सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी केली आहे.

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापुरातील मतदान केंद्रावर थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात, मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात 281 मतदान केंद्रे, जिल्ह्यात पदवीधरांसाठी 79 हजार मतदार, भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत असल्याने यावेळी होणार चुरशीन मतदान, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता.

विजयाची हॅटट्रिक करणार – सतीश चव्हाण 

औरंगाबाद : महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क, विभागीय कृषी कार्यालयातील मतदान केंद्रात बजावला हक्क, दोन टर्म मी चांगले काम केल्यामुळे मतदार मलाच निवडून देणार, यावेळी विजयाची हॅट्ट्रिक करणार – सतीश चव्हाण

भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी  बजावला  आपला मतदानाचा हक्क 

औरंगाबाद : भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पदवीधर निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला, औरंगाबाद शहरातील आयटीआय इमारतीतील मतदान केंद्रात शिरीष बोराळकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला, यावेळी शिरीष बोराळकर यांनी मला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून विजय आपलाच असल्याचा दावा केला.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सकाळी 10 पर्यंत 10 टक्के मतदान.

कोल्हापूर :  पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 11.75 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 18.22 टक्के मतदान, 10439 पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क, तर 12237 शिक्षकांनीही आतापर्यंत मतदान केले.

दौंड : आमदार राहुल कुल आणि कांचन कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क, दौंड तालुक्यातील राहू येथील कैलास विद्या मंदिर येथे जाऊन केले मतदान, पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राहुल कुल यांचे सपत्निक मतदान.

नागपूर : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही मतदानाचा हक्क बजावला, बेझनबाग परिसरातील नागसेन विद्यालयात मतदान, नागपूर पदवीधर मतदारसंघात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, भाजपचे वर्चस्व असलेला मतदारसंघ आम्ही नक्कीच जिंकू, आम्हाला यात मोठे यश मिळेल, असेही ते म्हणाले.

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातील मनसेचे उमेदवार विद्यानंद मानकर यांनी मतदानाचा हक्क बजावला, भोसरीतील राजमाता जिजाऊ विद्यालयात सहकुटुंब मतदान, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा विद्यानंद मानकर यांचे आवाहन.

धुळे : धुळे-नंदूरबार विधानपरिषदच्या मतदानाला सुरुवात, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदान प्रकिया सुरळीत चालू, 437 मतदार ठरवणार विधान परिषदेचे आमदार, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दहा मतदान केंद्र, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना, भाजपकडून माजी आमदार अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला, नागपुरात भाजपकडून संदीप जोशी तर महाविकास आघाडीकडून अभिजीत वंजारींमध्ये चुरस.

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी केले मतदान, पत्नीसह पोहोचले मतदान करण्यासाठी, विजय निश्चित असल्याचे केले वक्तव्य.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात, थर्मल चेकिंग करुनच दिला जातो मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश, मतदार मतदान केंद्रावर यायला सुरुवात.

नागपूर : शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनी बजावला मतदानाचा हक्क, नागपुरातील साखरे शाळा मतदान केंद्रात केले मतदान, प्रत्येक मतदारांनी मतदान करण्याचे केले आवाहन.

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला, पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी केले मतदान, बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क.

पुणे पदवीधर निवडणूक मतदान, भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला 

पुणे पदवीधर मतदारसंघात 4 लाख 24 हजार 983 मतदार, निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला, मागील निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.