रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स दुकानावर छापा…..

0

रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स दुकानावर छापा…..
सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त…..

वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथील नक्ष ट्रेडर्स या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभाग औरंगाबाद गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकला. या कारवाई पथकाने एका मारुती इको कारसह ८२ हजार रुपये किमतीचा गुटखा असा एकूण १ लाख ८८ हजार ६१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रांजणगाव शेणपुंजी येथील हनुमाननगर येथील मुख्य रस्त्यावर शीतल बाबुलाल बोहरा यांचे नक्ष ट्रेडर्स या नावाने दुकान आहे. या दुकानात दुकान मालक बोहरा आणि मारुती सुझुकी इको कार क्रमांक एमएच – २० ईई- २९१३ चा मालक हर्षल विजयकुमार पाटणी अशा दोघांनी संगनमत करून अवैध फायदा घेण्यासाठी नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा, पानमसाला आणिसुगंधी तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवला होता. दरम्यान या प्रकारची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीवरून अन्न औषध प्रशासन विभाग आणि औरंगाबाद गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई करून दुकानावर छापा मारला तसेच कारची झडती घेतली असता, कारमध्ये शासनाची बंदी असलेला पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असा एकूण ८२ हजार रुपये किमतीच्या साठ्यासह एक कार असा एकूण १ लाख ८८ हजार ६१४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा, पी एस अजिंठेकर, एन एल महाजन आणि औरंगाबाद गुन्हे शाखेचे फौजदार अमोल देशमुख, बी जी पवार आदींच्या पथकाने केली.
तसेच या प्रकरणी दोघांना कारसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या जोत्सना जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे हे करीत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.