कोव्हिड योद्ध्यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहन
उद्धव ठाकरेंकडून 'जय जवान जय किसान, जय कामगार'ची घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहन झाले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत,” अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. यावेळी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार, कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य, जय जवान जय किसान, जय कामगार, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे., कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान, ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य., राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार.