धावती बस अचानक पेटली, पाच जणांचा होरपळून मृत्यू

विजापूरहून बंगळुरुला जाणारी बस दुर्घटनाग्रस्त

0

कोल्हापूर : विजापूर-बंगळुरू मार्गावर रात्री नऊ वाजण्याचा सुमारास एक धक्कादायक घटना घटली. चालत्या बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. तर या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

विजापूरहून बंगळुरुला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची रात्रीची घटना. कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस २९ प्रवाशांना घेऊन विजापूरहून बंगळुरुला जात होती. रात्री ९ वाजता ही बस विजापूरहून निघाली असता अचानक पेटली. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.