पूजा चव्हाण प्रकरणात अखेर पहिला खटला दाखल, लष्कर न्यायालयात सुनावणी

पुणे लष्कर न्यायालयात पहिल्या खटल्याची नोंद, पुणे न्यायालयात 5 मार्चला पुढील सुनावणी होणार

0

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अखेर पहिला खटला दाखल झाला आहे. पुणे लष्कर न्यायालयात पहिल्या खटल्याची नोंद झाली आहे. लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली. आज या खटल्यावर युक्तिवादही झाला, मात्र 5 मार्चला पुणे न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. अज्ञात व्यक्तीवर हा गुन्हा दाखल व्हावा याकरिता फिर्यादी अॅड. भक्ती पांढरे यांच्या नावाने हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली. आज या खटल्यावर युक्तिवादही झाला, मात्र 5 मार्चला पुणे न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. अज्ञात व्यक्तीवर हा गुन्हा दाखल व्हावा याकरिता फिर्यादी अॅड. भक्ती पांढरे यांच्या नावाने हा अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच प्रकरणात भाजपने शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पहिली तक्रारही भाजपनेच केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांची सून आणि भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी काल वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. भाजप युवा मोर्चाने काल पुण्यात आंदोलनही करुन, संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

चित्रा वाघ यांच्याकडून घटनास्थळी जाऊन पाहणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सध्या पोलिसांनी सील केला आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची उंची पाहता, पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतके सगळे होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

11 ऑडिओ क्लिपने खळबळ

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली आहे ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचे समजते. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चालले असून, पुणे पोलिसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.