मनसे भूमिकेवर ठाम; ‘कितीही दबावतंत्र वापरा तरी आज ‘झटका मोर्चा’ होणारच’

राज्य सरकारने नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करावे, अशी मागणी

0

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाविरोधात राज्यात राजकारण तापलेले आहे. राज्य सरकारने नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कितीही दबावतंत्र वापरले तरी मनसेचा मोर्चा होणारच, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने मुंबईमध्ये  आज गुरुवारी (26 नोव्हेंबर) मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मनसेने खास तयारी सुरु केली आहे. मनसेने वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. त्यासाठी मनसेकडून शहरात ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विशे ष म्हणजे मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या परिसरातदेखील बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये वीजबिल न आलेल्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यावेळी याबद्दल विचारले असता, “मनसेचा आज गुरुवारी (26 नोव्हेंबर) रोजी वाढीव वीजबिलाविरोधात आयोजित करण्यात आलेला मोर्चा कुठल्याही परिस्थितीत होणारच. कितीही दबाबवतंत्र वापारले तरी हा मोर्चा होणारच. मनसेच्या मोर्चाबाबत नेत्यांमध्ये कसलाही संभ्रम नाही,” असे मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात वाढीव बीजबिल आल्याने राज्य सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. याच मुद्द्यावरुन भाजपनेदेखील सरकारवर चांगलीच टीका केली. भाजपने सरकारविरोधात 23 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन केले होते. यावेळी भाजपने राज्यभर वीजबिलाची होळी करत जनतेचे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती. तसेच, जर कोणी वीज कापायला आले, तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील, असा इशाराही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानंतर आता वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वीजबिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपाटले आहेत. याआधीही मनसेने वाढीव वीजबिलाविरोधात पोस्टरबाजी केली होती. मुंबईतील दादर, माहीम या भागात मनसेने 22 नोव्हेंबरला ठिकठिकाणी पोस्टर्स लावले होते. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता.  शिवाय शॉकसाठी तयार राहा, असा इशारा देत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.