हवेत फायरिंग, औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचे फिल्मी स्टाईलने अपहरण

शहरातील देवानगरीमध्ये आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अपहरणाची धक्कादायक घटना

0

औरंगाबाद : हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील देवानगरी भागात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच बांधकामाचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता.पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण केले. शहरातील देवानगरी जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे. नाझीम पठाण राउफ पठाण असे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी नाझीम पठाण राउफ पठाण या बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.